
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड या विद्यालयाचे तब्बल 67 विद्यार्थी पात्र ठरले. सारथी कडून दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील एकूण 95 विद्यार्थी पात्र ठरले आहेत सारथी आणि एनएमएमएस दोन्ही मिळून 162 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.या वर्षी मुलांनी 67 लाख 98 हजार रुपयांची शिष्यवृत्ती पटकावली.कागल तालुक्यात हा अव्वल क्रमांक आहे. प्रशालेने शैक्षणिक वर्ष 2020 ते 2024 अखेर एक कोटी 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त केली. पाच वर्षात 2 कोटी 13 लाखाची स्कॉलरशिप खेचून परिसरातील शेकडो कुटुंबातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन दिले.
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे,कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, प्राचार्य एस.पी.पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी उपप्राचार्य एम.डी.खाटांगळे, पर्यवेक्षक एस.डी.साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर विभाग प्रमुख ए.एन.पाटील, एन.एन.गुरव, ए.एस.चंदनशिवे, समीर कटके, वाय.ई.देशमुख, सविता गावडे, संजीवनी भोई, भाग्यश्री मुसाई, नंदा सारंग, सुप्रिया बाईत गजानन नार्वेकर, महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
