मुख्य संंपादक – अजय तुम्मे
कागल तालुका संपादक – शिकंदर जमादार

सिल्लोड प्रतिनिधी सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या महत्त्वाचे पदावर असलेले विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके हे स्वतः शासनाचे सेवेत असून पत्नी मौजे शिरसाळा ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैर उपयोग करून स्वतःच्या दोन्ही मुलांच्या नावे रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर व गाय गोठा या शासकीय योजनेचा लाभ घेतला लाभ दिला म्हणून व स्वतः शेळके हे ग्रामपंचायत सरपंच यांच्या कामात हस्तक्षेप करतात म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी माहिती अधिकार संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता तथा संपादक तथा बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आमरण उपोषणास पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे बसले आहे.
याविषयी सविस्तर असे की दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी तक्रारदार राजू रोजेकर यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड तहसीलदार सिल्लोड गटविकास अधिकारी सिल्लोड यांना लेखी तक्रार देऊन याविषयी संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात यावा आणि तक्रारकर्ते यांना स्वतः त्याची प्रत देण्यात यावी तसेच दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार देऊन जर वेळेत कारवाई झाली नाही तर मी दिनांक 26 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल असे तक्रारीत म्हटले होते परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई किंवा कार्यवाही न केल्यामुळे त्यांना आज उपोषणाची वेळ आलेली आहे याची शासनाने त्वरित दाखल घ्यावी अशी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडून मागणी होत आहे.

