मुख्य संपादक – अजय तुम्मे
कागल तालुका संपादक – शिकंदर जमादार

राधानगरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ कसबा वाळवे व रोटरी समाजसेवा केंद्र कसबा वाळवे यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक भवन कसबा वाळवे या ठिकाणी रविवार, दि.19/01/2025 रोजी ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा संपन्न झाला.
ज्येष्ठांनी आपल्या उतार वयात जगण्याचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे, देण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवला पाहिजे असे वक्तव्य अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य मा. श्री. रामकुमार सावंत गुरुजी यांनी अध्यक्ष स्थानावरून केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. डी. एस. कस्तुरे यांनी ज्येष्ठ शब्दाचे महत्त्व सांगत ज्येष्ठांनी मनोरंजनावर, करमणुकीवर जास्त भर द्यावा आणि मोबाईल हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करावे असा संदेश दिला कार्यक्रमांमध्ये वैशाली नायकवडे, प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे, अशोक तोडकर, आर. आय. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि मान्यवरांचे स्वागत मा. श्री. महादेव शंकर पाटील यांनी केले, प्रास्ताविक एम. एस. संकपाळ सर यांनी केले, आभार श्री. आर. वाय. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री.अजय पालकर सर यांनी मांडले.
