RTI संघर्ष न्यूज महाराष्ट्र.
संपादक – अजय तुम्मे.
तालुका प्रतिनिधी – सिकंदर जमादार (मुरगूड.)
येथील महालक्ष्मी नगर व सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीतील सर पिराजीराव रोड या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता मुरगूड शहराच्या विकास आराखड्या नुसार 15 मीटर रुंदीचा डीपी रोड आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण व 15 मीटर रुंदीकरण करावे अशी मागणी महालक्ष्मी नगर व सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीतील नागरिकांनी मुरगूड नगरपरिषद कडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुरगूड शहरातील फोंडा – निपाणी राज्य रस्त्याला लागून असणाऱ्या महालक्ष्मी नगर व सूर्यवंशी/मांगोरे कॉलनी सन 1990 ते 1991 ला कलेक्टर एन. ए. झाली आहेत. सदर रेखाकनातील महालक्ष्मी नगर मधील उत्तर – दक्षिण दिशेतील 9 मीटर रुंदीचे प्रस्तावित रस्ते या पूर्व – पश्चिम दिशेतील मुरगूड शहर विकास आराखडा मध्ये मंजूर 15 मीटरच्या डीपी रस्त्यास जोडले गेले आहेत.
महालक्ष्मी नगर मधील सिटी सर्वे नंबर – (511) मधील रस्ता व सूर्यवंशी/मांगोरे कॉलनी मधील सिटी सर्वे नंबर – (514-ब-1) व (565-ब-1) हे मुरगूड नगरपरिषद कडे वर्ग असून देखील 34 वर्ष नगरपरिषदने रस्ता अभावी कॉलनीतील नागरिकांना वंचित ठेवण्यात आले आहे. महालक्ष्मी नगर व सूर्यवंशी/मांगोरे कॉलनीत काही नागरिकांनी मुरगूड नगरपरिषदची परवानगी न घेता रस्त्यातच बांधकामे करून अतिक्रमण केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
सिकंदर जमादार यांच्या घरापासून ते सरपिराजी रोड पर्यंत जाणार हा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे ये – जा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे सदर वसाहती मधील नागरिकांना बाजारपेठेशी संपर्क साधण्याचा हा मुख्य रस्ता असून वाहतूक दळणवळण व सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने सदर रस्ता 15 मीटर रुंदीचा डीपी रस्ता कोणताही गौण फेरफार न करता ताबडतोब होणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत नगरपरिषद कडे वारंवार लेखी व तोंडी तक्रार देऊन ही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. हेतू पुरस्कार डावलण्यात येत आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सिकंदर जमादार, स्नेहल जाधव, कृष्णात पाटील, भैरवनाथ पाटील, सोहेल नदाफ, गुलाब जमादार, रामचंद्र सारेपुत्र, विनायक सुतार, मधुकर मंडलिक, यांच्या सह्या आहेत.