संपादक – अजय तुम्मे
तालुका प्रतिनिधी – शिकंदर जमादार
RTI संघर्ष न्यूज

भारतीय युवा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणी व ६ जानेवारी पत्रकार दिनाचे नियोजना संदर्भात हुपरी येथे पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष अल्लाउद्दीन मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सन २०२५ – २०२६ ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दैनिक द वाळवा क्रांतीचे रणजित देवणे तर उपाध्यक्षपदी दैनिक वाळवा क्रांतीचे अमोल सवाईराम, सचिव पदी आज की तेज खबरचे अनिल पुजारी यांची एक मताने निवड करण्यात आली.
यावेळी पत्रकार राजेंद्र शिंदे, हुमायून नदाफ, प्रविण घाटके, सचिन उगळे, राजेंद्र पुजारी, सचिन कुंभार, प्रतीक निंबाळकर, रिजवान मुजावर उपस्थित होते.
