मुख्य संपादक – अजय तुम्मे
तालुका कागल शहर संपादक – शिकंदर जमादार

👉 सहभाग कार्यक्रमाचे प्रमाणपत्र 👈
कै. सौ. विजयाताई आनंदराव पाटील महिला ज्येष्ठ नागरिक संघ काळमा बेलेवाडी. तालुका कागल. जिल्हा-कोल्हापूर येथे बुधवार दिनांक 29/01/2025 इ. रोजी सलग्नता प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष आनंदराव पाटील होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य सावंत गुरुजी तसेच कोल्हापूर प्रादेशिक विभाग कोल्हापूरचे अध्यक्ष आर. आय. पाटील व कागल जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भोसले गुरुजी उपस्थित होते.
महिला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यांना आनंदराव पाटील यांच्या हस्ते सलग्नता प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी महिला ज्येष्ठ नागरिक संघटनांचे आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य सावंत गुरुजी यांनी गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ व प्रत्येक गावात महिला ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्याची गरज स्पष्ट केली. ग्रामीण भागातील महीलाचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांचे जीवन आनंदी होण्यासाठी जे करावे लागतात ते शासनाने केले पाहिजे असे मत मांडले. आर. आय. पाटील यांनी ज्येष्ठांच्या चळवळीला समाजाचा सामूहिक सहकार्य मिळाले पाहिजे असे मत मांडले. कागल तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची अध्यक्ष भोसले गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
या कार्यक्रमास हंबीरराव पाटील, समीर पाटील, सुशीला पाटील, सुनंदा पाटील, शांताबाई पाटील, रुक्मिणी गुरव, निर्मला पाटील, सुतार तसेच कै. सौ. विजयाताई आनंदराव पाटील महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व संचालिका, व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर. के. पाटील सर यांनी केले व आभार पाटील मॅडम यांनी मांडले. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

