संपादक – अजय तुम्मे
कागल तालुका/ प्रतिनिधी – शिकंदर जमादार
सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मौजे ग्रामपंचायत शिरसाळा येथे स्वतः महिला सरपंच यांचे पती पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी पंचायती विभाग मध्ये शासनाच्या महत्त्वाच्या पदावर असताना आणि त्यांच्या पत्नी हा स्वतः सरपंच असताना त्यांनी स्वतःच्या दोन मुलांच्या नावे रोजगार हमी योजनेअंतर्गत
वैयक्तिक सिंचन विहिरीचा व तसेच एका मुलाच्या नावे गाय गोठा चा लाभ त्यांच्या पदाचा गैर उपयोग करून देण्यात आला. याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ता राजु रोजेकर यांनी आज दिनांक १७ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आणि गट विकास अधिकारी, यांना तक्रार दिलेली आहे सोबत त्यांनी लाभ घेतल्याचे पुरावे ही जोडलेले
आहेत याविषयी पाच दिवसांमध्ये चौकशी होऊन तसेच ग्रामपंचायत शिरसाळा चे दप्तर तपासणी होऊन जे जे दोषी आहेत त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी नसता दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार राजु रोजेकर स्वतः पंचायत समिती सिल्लोड या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे तक्रार त्यांनी दिलेली आहे.
