मुख्य संपादक – अजय तुम्मे
तालुका प्रतिनिधी – सिकंदर जमादार

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवून आयपीएस अधिकारी झाल्याबद्दल श्री. बिरदेव डोने यांचा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री. टेकाळेसो यांचे वतीने, कोल्हापूर प्रादेशिक विभाग कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. आर. आय. पाटील व श्री. बाळासाहेब फराकटे यानी शाल, श्रीफळ, बुके व 11 पुस्तकांचा संच देऊन सत्कार केला . त्यांना सन्मानित केले.
श्री. डोने यांच्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाची चीज झाले. या उतारे वयात त्यांना आधार मिळाला, आनंद वाटला म्हणून साठीच ज्येष्ठ नागरिकांचे वतीने सन्मान करण्यात आला याचा आम्हाला आनंद आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रात्रंदिवस काबड कष्ट करून, पायाला पान बांधून, अखंड चिकाटीने प्रतिकुल
परिस्थितीवर मात करून यश खेचून आणले याबद्दल सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार करणे अत्यंत आवश्यक होते. महाराष्ट्र ज्येष्ट नागरिक महासंघ मुंबईचे अध्यक्ष मा. टेकाळे साहेब यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर प्रादेशिक विभाग कोल्हापूरचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्या हस्ते आय पी एस अधिकारी श्री. बिरदेव डोने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी संचिता किल्लेदार या विद्यार्थिनींने ही बुके देऊन सन्मान केला आपणही स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याची प्रेरणा आज घेत आहोत असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी कागल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव भोसले, सचिव दिनकर, वाडकर गुरुजी, श्री. संभाजी फराकटे, श्री. नामदेव बल्लाळ, श्री. साताप्पा पाटील आणि पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
